पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महापालिकेचे कर्मचारी या संकटाचा पहिल्या दिवसापासून मुकाबला करत आहेत. दरम्यान कोरोना या आजाराची जनजागृती करण्याची मोहिम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतली आहे. थेरगावमधील डांगे चौक तसेच आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे प्रबोधन तसेच जनजागृती करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिका ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग प्रभाग क्र.२४ व खिवंसरा पाटील विद्यामंदिर गणेशनगर थेरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त तथा ग क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट यांच्या नियंत्रणाखाली व या प्रबोधनास उपस्थित ग क्षेत्रीय सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू बेद व मुख्याध्यापक नटराज जगताप या प्रभागाचे आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल तसेच मुकादम विजया जाधव तसेच कर्मचारी अरुण राऊत, प्रशांत पवार, अभय दारोळे, राजू जगताप, अनिल डोगरे, सूर्यकांत चाबुकस्वार, सुषमा गायकवाड, कविता राजगुरू, सहकारी शिक्षक सरला पाटील, विना तांबे, मीना जाधव, प्रमोदींनी बकरे, स्मिता जोशी, सीमा आखाडे, गणेश शिंदे, संदीप बरकडे, स्नेहा पाठक, योगिता गायकवाड, सुवर्णा उदास, आशादेवी थोरात यांनी थेरगाव येथील डांगे चौकातील मजूर अड्डा येथे २०० कामगारांना कोरोना (covid 19) या साथीच्या आजाराबाबत घ्यावयाची खबरदारी याचे प्रबोधन व जनजागृती केली.
तसेच आज दि.२५ रोजी थेरगाव येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल येथे येणारे नागरिक, रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक यांना कोरोना (covid 19) या साथीच्या आजाराबाबत घ्यावयाची खबरदारी याचे प्रबोधन व जनजागृती करण्यात आली.
यावेळी बिर्ला हॉस्पिटल चे CEO रेखा दुबे, डॉ.राजशेखर अय्यर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय सल्लागार, रमेश दीक्षित H R मॅनेजर, डॉ.आशुतोष श्रीवास्तव मेडिकल डायरेक्टर, राजेश दुबे, चंद्रकांत भोसले व्यवस्थापन मॅनेजर, अभिषेक राजपूत, फायर ऑफिसर, रमेश यादव, अमोल शिवणेकर, सपना महाजन PRO, मुख्याध्यापक नटराज जगताप, प्रभागाचे आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल तसेच मुकादम विजया जाधव, कर्मचारी अरुण राऊत, प्रशांत पवार, अभय दारोळे, राजू जगताप, अनिल डोंगरे, सूर्यकांत चाबुकस्वार, सुषमा गायकवाड, कविता राजगुरू, सहकारी शिक्षक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group