पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार यावर्षी ३१ मार्च २०२१ रोजी साजरी करण्यात येत आहे. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता उन्नती सोशल फाउंडेशन येथे यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आली.
फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार घालून त्यांचे हस्ते पूजन करण्यात आले. त्यावेळी अमोल भंगाळे, सुनील गीते, मीत साळुंखे, संजय डांगे, रोहित चिकले हे उपस्थित होते.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले की, कोविड-१९च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.






















Join Our Whatsapp Group