सामाजिक सुरक्षा पथकाची शिरगावच्या हद्दीत कारवाई
पिंपरी (Pclive7.com):- मुंबई ते हडपसर अवैध गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो शिरगाव येथे सापळा रचून पकडला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली असून २० लाख ५४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी करम होशीयतअली शेख (वय २९ वर्षे, रा.कामन रोड, कामन पोलीस चौकीचे बाजूला, भिवंडी, ठाणे) व इतर ०१ इसम यांच्या विरुध्द शिरगाव पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद भोईटे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबतचे आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करत आहे. त्या अनुषंगाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन (दि.३०) रोजी शिरगाव पोलीस चौकी हद्दीत अवैध गुटख्याची वाहतुक करणाऱ्यांवर सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत १२ लाख ३० हजार ५६० रुपये किंमतीचा विविध कंपनीचा गुटखा, ३ हजार ३०० रुपये रोख रक्कम, पाचशे रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा साधा मोबाईल, ८ लाख २० हजार रुपये किंमतीची एक महिन्द्रा बोलेरो पिकअप (एमएच ४७ एएस १४८१) असा एकुण २० लाख ५४ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी शिरगाव पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस अंमलदार विजय कांबळे, पोलीस हवालदार सुनिल शिरसाट, संतोष बर्गे, नितीन लोंठे, पोलीस नाईक भगवंता मुठे, मारुती करचुंडे, अनिल महाजन, गणेश कारोटे, पोलीस शिपाई राजेश कोकाटे, महिला पोलीस शिपाई सोनाली माने यांनी केली.






















Join Our Whatsapp Group