पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षी शिवजयंती चौकांमध्ये साजरी न करता शिव प्रतिष्ठान नवी सांगवी या मित्र मंडळाने शिवजयंती घराघरात साजरी व्हावी यासाठी शिवरायांच्या ३०० मूर्तीचे वाटप करून एक एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली. व सर्व नागरिकांना कोरोना बाबत काळजी घेण्यासाठी विनंती केली.
यानिमित्ताने घराघरात शिवजयंती साजरी करून महाराजांचा आदर्श घेऊन प्रत्येक घराघरात एक मावळा तयार व्हावा व स्त्रियांबाबत आदर निर्माण व्हावा. तसेच तरुण वर्गातील सर्व मुला-मुलींनी व्यसनापासून दूर रहावे असे संदेश देऊन आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रसाद पवार, अविनाश इंदलकर, सुस्मित भाईगडे, अभिषेक पांचाळ, मंदार दाभाडे, प्रशांत माटुर, आकाश पांचाळ, पंकज धाराशिवकर, सत्यम गवंडळकर, निशिकांत वानखेडे, सुमित किजबिले, इज्जत सय्यद, आकाश सोनवणे, अतुल धनावडे व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group