पिंपरी (Pclive7.com):- प्लाझ्मा दात्यांना २ हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याची महापौर माई ढोरे यांची घोषणा फसवी असल्याची टीका प्रहार संघटनेने केली आहे.
याबाबत संजय गायखे यांनी म्हटले आहे की, महापौर ढोरे यांनी आठ दिवसांपूर्वी प्लाझ्मा दान करणाऱ्यांना पालिकेकडून दोन हजार रुपये बक्षीस देण्याची तसेच वायसीएम रक्तपेढीतून शहरातील सर्वच रुग्णांला मोफत प्लाझ्मा दिला जाईल, अशी घोषणा केली.
परंतु, ही घोषणा म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ठरली आहे. दात्याला दोन हजार रुपये तर मिळत नाहीतच शिवाय दाता देऊनही रुग्णांना सहा हजार रुपये भरल्याशिवाय प्लाझ्मा मिळत नाही.
महापौरांची घोषणा झाल्यावर अनेकांनी आमच्या पाठपुराव्याला यश आले असे म्हणत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, वस्तुस्थिती वेगळीच आहे. महापौरांच्या घोषणेची अंमलबजावणी करावी अन्यथा उपोषणाला बसू असा इशारा संजय गायखे यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group