पिंपरी (Pclive7.com):- लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या ७६ व्या जयंती निमित्त पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेस कडून आज सरस्वती अनाथ आश्रम संस्था दापोडी येथे धान्य व दैनंदिन वापराच्या व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
बुधवारी दुपारी १२ वाजता संस्थेच्या कार्यालयात जाऊन हि भेट सुपूर्द करण्यात आली. भेट संस्थाचालक देवीदास सुरवसे यांनी स्वीकारली व युवक काँग्रेस पदाधिका-यांचे त्यांनी आभार मानले. पीठ, तांदूळ, साखर, मैदा, गूळ, तेल व भाजीपाला आदि पदार्थ देण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिचंवड शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एन.एस.यु.आय.चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव कौस्तुभ नवले, पिपंरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, शहर युवक काँग्रेस चे सरचिटणीस शंकर ढोरे, अनिल सोनकांबळे, स्वप्निल बनसोडे, विशाल सरवदे, मिंलिद बनसोडे, अर्णव कामठे, तेजस पाटील, ओम शितोळे, मयुर तिखे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन चिचंवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केले.