शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांचा उपक्रम
पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धनंजय भालेकर मित्र परिवार व गणेश मित्र मंडळाच्या वतीने रुपीनगर तळवडे परिसरातील सलून व्यवसायिकांना कोरोना महामारीच्या संकट काळात धान्य व किराणा मालाच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, या संकट काळात गोरगरीब व गरजूंना तुम्ही मदतीचा हात दिला आहे, या उपक्रमाचा इतरही आदर्श घेतील पुढील काळात आपल्या संघटनेच्या माध्यमातून असेच समाजोपयोगी उपक्रम होवोत, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक विक्रांत लांडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, उद्योगपती रमेश कुमार परमार, ज्ञानदीप विद्यालयाचे माजी प्राचार्य सूर्यकांत भसे सर, रुपीनगर शिक्षण संस्थेचे संचालक सुधाकर दळवी, अरुण थोपटे, नासीर शेख, वसंत सावंत, राजू खटावकर, संतोष पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पोळ, नाभिक मंडळाचे रुपीनगर विभाग प्रमुख दत्ता खरे, विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.