पिंपरी (Pclive7.com):- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भरगच्च सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. मनसेच्या विविध शाखांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहराध्यक्ष सामाजिक बांधिलकी जपली.

निगडी-राहुलनगर या ठिकाणी डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत मध्ये ४० झाडाचे वृक्षारोपण सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. जनहित व विधी कक्ष यांच्या वतिने चिंचवड गावठाण या ठिकाणी गोशाळामध्ये चारा दान करण्यात आले.
प्रभाग क्रमांक १६ – रावेत किवळे प्रभागात कोरोना योध्दा कार्यक्रम घेण्यात आला व वृक्षारोपण करण्यात आले. चिंचवड बिजलीनगर परिसर या भागांत प्रभाग अध्यक्ष अक्षय नाळे व मित्रपरीवार यांच्या वतिने वृक्षारोपण करण्यात आले. महिला सेना यांच्या वतिन मौनिबाबा अनाथ आश्रम या ठिकाणी अनाथ महिला यांना साहित्य वाटप करण्यात आले.
चिंचवड मोहननगर परिसर या ठिकाणी दत्ता देवतरासे विभाग अध्यक्ष पिपरी विधान सभा यांच्या वतिन रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना यांच्या वतीने काळभोरनगर चिंचवड येथील मदर टेरेसा अनाथाश्रम येथे ५० किलो साखर, धान्य, मसाले, लाडू आणि हॅन्डग्लोज इत्यादी वाटप करण्यात आले. पिपंरी एचए कॅालणी येथे सुमित कलापुरे व मित्र परिवार यांच्या वतिने वृक्षारोपण करण्यात आले. पिपंरी महात्मा फुलेनगर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
यावेळी सचिन चिखले (शहर अध्यक्ष नगरसेवक) रूपेश पटेकर,राजू सावळे, बाळा दानवले,विशाल मानकरी, हेमंत डांगे, प्रतीक शिंदे, स्वप्निल महांगरे, गणेश उज्जनकर, बालाजी पांचाळ, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुशांत साळवी, नितीन सूर्यवंशी, शिवकुमार लोखंडे अमर माळी, महिला सेनेच्या अश्विनी बांगर, स्नेहल बागर, सिमा बेलापुरकर, संगिता देशमुख, विधी व जनहित कक्ष यांच्या वतिने – राजु भालेराव, राजेश अवसरे, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group