पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १ जुलै पासून पार्किंग पॉलिसी लागू करण्यात आली आहे. हा निर्णय सत्ताधारी भाजपाने शहरवासियांवर लादला असून, त्याच्या निषेधार्थ पिंपरीत आज (दि.०२) महापालिकेने उद्घाटन केलेल्या ‘पे अँड पार्क’च्या फलकाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काळे फासले आहे. राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
गरिबों के सन्मान मै.. राष्ट्रवादी मैदान मै.., दहा रूपयांचा चहा अन् वीस रूपयांचे पार्किंग.., धिक्कार असो.. धिक्कार असो.. सत्ताधारी भाजपाचा धिक्कार असो.. अशा घोषणा करत भाजपाने शहरात सुरू केलेल्या ‘पे अँड पार्क’ धोरणाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.
विशाल वाकडकर म्हणाले की, सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्यांनी आर्थिक फायद्यासाठी हा निर्णय जनतेवर लादला आहे. भाजपाने तातडीने हा निर्णय रद्द करावा अन्यथा राष्ट्रवादी युवकच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही वाकडकर यांनी यावेळी दिला.





















Join Our Whatsapp Group