पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाकरिता विनायक गायकवाड युथ फाऊंडेशनच्या वतीने वाकड परिसरात ठीक ठिकाणी गणेश विसर्जन हौदची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे पिंपरी चिंचवड शहरात महापालिका प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे.
गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील माजी नगरसेवक विनायक गायकवाड आणि माजी स्थायी सभापती तथा विद्यमान नगरसेविका ममता गायकवाड यांच्या पुढाकाराने वाकड परिसरात गणेश विसर्जन हौद तयार करण्यात आलेत. तरी सर्व गणेशभक्तांनी गणेश विसर्जनाकरिता घाटावर गर्दी न करता खालील दिलेल्या ठिकाणी विसर्जन करावे असे आवाहन विनायक गायकवाड यांनी केले आहे.
गणेश विसर्जन हौद ठिकाण :-
०१) युरो स्कुल, पिंक सिटी रोड०२) ग्लोबल पंजाब हॉटेल समोर, पिंक सिटी रोड०३) उत्कर्ष चौक, दत्त मंदिर रस्ता ०४) छत्रपती चौक, कस्पटे वस्ती























Join Our Whatsapp Group