पिंपरी (Pclive7.com):- रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि.१८) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार होती. पण, काही तांत्रिक अडचणीमुळे शट डाऊन दि.१८ ऐवजी दि.२५ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी नवीन प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
पिंपरी चिंचवडकरांसाठी रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर २३ निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे.
सेक्टर क्र.२३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे.
त्यासाठी गुरुवारी (दि.१८) शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार होती. त्यामुळे महापालिकेमार्फत गुरुवारी शहरातील सर्व भागांचा सायंकाळाचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार होता, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले होते.
मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे सदरचा Shut Down दि.१८ ऐवजी दि.२५ नोव्हेंबर रोजी घेण्याचे ठरविले आहे. तरी आपणास विनंती आहे की, आपण यापूर्वी केलेला दिनांक १८-११-२०२१ रोजीचे पाणीपुरवठा बंद करण्याबाबतची बातमी विचारात न घेता नवीन आलेली सूचना लक्षात घ्यावी. पुढील नियोजित Shut Down बाबत आपणास कळविणेत येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी दिली आहे.























Join Our Whatsapp Group