पिंपरी (Pclive7.com):- क्रांति युथ मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने भाजप शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे व अल्पसंख्यांक मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष फारुक इनामदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधूनआयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १४७६ नागरिकांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले.

क्रांति युथ मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कामगार नेते सचिन लांडगे यांच्या हस्ते हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या शिबिरात या योजनेचा १४७६ नागरिकांना लाभ घेता आला. ज्या लाभार्थ्यांनी शिबिरात “बायोमेट्रिक थम” नोंदणी केली, त्यांना मोफत हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना हेल्थ कार्ड मिळाले आहेत त्यांना आरोग्याच्या कोणत्याही समस्ये संदर्भात ५ लाखाचा मोफत आरोग्य विमा प्रती वर्ष मिळणार आहेत.
या कार्यक्रमाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवान शिंदे, निलकंठ तागतोडे, किरण पवार, नवनाथ कांबळे, मंगेश कुलकर्णी, बबलू सय्यद, चंद्रशेखर कणसे आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group