पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी महिला शहराध्यक्षा सारिका पवार यांच्या नेतृत्वाखाली आज पिंपरी येथील घरोंदा हॉटेल येथे ओबीसी महिलांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वरजी बाळबुधे म्हणाले की, आज ज्या महिलांची निवड झाली, या महिलांनी पक्ष संघटना वाढीसाठी काम करावे व राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम आपण सर्वांनी करावे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सारिका पवार यांचे काम अतिशय उत्तम सुरू आहे.
ओबीसी महिला पक्ष संघटन वाढीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे त्या काम करत आहेत. याचा नक्कीच पक्षाला फायदा होईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर आपल्याला राष्ट्रवादीची सत्ता काबीज करू व पिंपरी-चिंचवड शहराचे भाग्यविधाते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व काम करूया. निवड झालेल्या महिलांच्या हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असे प्रतिपादन बाळबुधे यांनी केले.
यावेळी सारिका पवार म्हणाल्या की, आज ज्या महिलांची निवड करण्यात येत आहे त्यांनी आपले पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावे व अधिकाधिक महिलांना पक्षसंघटनेत सामील करून घ्यावे.
निवड झालेल्या महिलांची नावे व पद पुढील प्रमाणे पिंपरी चिंचवड विधानसभा ओबीसी महिला अध्यक्ष सौ. पद्मा सुरेश म्हात्रे व उपाध्यक्ष सौ. माधुरी सोनार, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष सौ. रंजना दर्शले, उपाध्यक्ष सौ.प्रतिभा भुजबळ, भोसरी विधानसभा अध्यक्ष सौ. सुरेखा माळी व उपाध्यक्ष सौ. स्मिता वाघेरे व
तसेच उपाध्यक्ष अंकिता गोरे अशा एकूण 28 महिलांचे विविध पदावर नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर मंगला कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवडचे प्रवक्ते फजल शेख, निरीक्षक सचिन औटे, ओबीसी शहराध्यक्ष विजय लोखंडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, अर्बन सेलचे अध्यक्ष माधव पाटील, पिंपरी विधानसभा अध्यक्ष सौ.पल्लवी पांढरे, सौ.गंगा धेंडे, भोसरी विधानसभा मनीषा गटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पिं.चिं शहर उपाध्यक्ष पी.के. महाजनभाऊ, सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम, अकबर मुल्ला, अनिकेत उबाळे, प्रदीप घुमे व नव निर्वाचित महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.के महाजन यांनी केले. आभार योगेश मोरे यांनी मानले.























Join Our Whatsapp Group