पिंपरी (Pclive7.com):- “अच्छे दिन”,पेट्रोल, डिझेल के दाम कम हुवे की नही हुवे ? घरेलू ग्यास के दाम कम हुवे की नही हुवे ? अच्छे दिन आये की नही आये असे म्हणत पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जुमलेबाज सरकारचे आभार मानले. थाली बजाओ, खुशिया मनाओ, अभूतपूर्व इंधन दरवाढीचा अशा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेना सचिव वरून सरदेसाई, राजेश पळसकर यांच्या मार्गदर्शना खाली आणि पिंपरी-चिंचवड युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल, डाळीच्या महागाईविरोधात आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. इंधन दरवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणाऱ्या व या जुमलेबाज केंद्रातील सरकारचे पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेच्या वतीने चाफेकर चौक चिंचवडगाव या ठिकाणी थाळी वाजवून विश्वजीत बारणे व चिंचवड विधानसभा अधिकारी माऊली जगताप यांनी मोदी सरकारचे आभार मानले.
यावेळी युवासेना समन्वयक रुपेश कदम, युवासेना उपशहर आधिकारी राजेंद्र तरस, पिंपरी विधानसभा अधिकारी नीलेश हाके, उपशहर अधिकारी निखिल येवले, शिवसेना पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदनकर, वैशालीताई मराठी, चिंचवड विधानसभा समन्वयक नितीन पाटील, ओंकार विनोदे, सागर शिंदे, नाझिम खान, रवी चव्हाण, अभिजित पाटील, आशिष बाबर,सुनील पाटील, प्रदीप राजपूत, लोकेश जगताप, गणेश सुतार, दिपक बाविस्कर, चेतन सोनवणे, विजय पाटील, संतोष नागोजी, गोपाळ तळेकर, महेंद्र गायकवाड, आकाश धनगर, हेमंत पाटिल, शुभम भदाणे, राजेश अडसूळ, कुदरत खान, किशोर सातपुते, शुभम पाटील, दीपक बाविस्कर, नदीम शेख, शुभम चौधरी, विशाल पाटील, नितीन पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक जुनेद खान आदी युवासैनिक आंदोलनाला उपस्थित होते.
युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे म्हणाले, “केंद्रातील जुमलेबाज भाजप सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. घरगुती गॅसच्या दरात प्रचंड वाढ केली. 1 हजारांपर्यंत गेलेला गॅस सर्वसामान्य नागरिकांना घेणे परवडत नाही. पाच राज्याच्या निवडणुका संपताच भाजपने पेट्रोल, डिझेलचे दर वाढविण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. पेट्रोल 117 रुपये लिटर पर्यंत गेले आहे. केंद्रातील भाजप सरकारने जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. अभूतपूर्व इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी युवा सेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले”.