पिंपरी (Pclive7.com):- पीएमपीएलच्या वतीने ३५० इलेक्ट्रीक बस (ई-बस) खरेदी करण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हिस्सातील १४० ई-बस आहेत. प्रतिबस ५० लाख सबसिडीप्रमाणे ७० कोटी रकमेपैकी ६२ बससाठी पालिका ३१ कोटी रुपये पीएमपीएलला देणार आहे. तो निधी बस खरेदीपूर्वीच दिला जाणार आहे.

पीएमपीएलच्या वतीने ३५० ई-बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यापैकी महापालिकेच्या हिश्श्याच्या १४० बस आहेत. प्रतिबसला ५० लाख सबसिडी आहे. त्यानुसार पालिकेस ७० कोटी रुपयांचा निधी पीएमपीएलला देणे आहे. पहिल्या टप्प्यात ६२ बस खरेदी करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ३१ कोटी खर्च आहे. तो निधी देण्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी स्थायी समिती सभेत मंजुरी दिली आहे.
निगडी, भोसरीत ई-बससाठी चार्जिंग स्टेशन
पीएमपीएलच्या ताफ्यात १५० इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहे. येत्या वर्षांत ५०० इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. या सर्व बससाठी शहरात इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. निगडीतील भक्ती शक्ती समुह शिल्प चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बसस्थानक येथे एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. भोसरी टर्मिन्स या ठिकाणी एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.
याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी पीएमपीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये १ ऑक्टोबर २०२० मध्ये धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे बसच्या वापरातील या दोन जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र पालिका देणार आहे त्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली.






















Join Our Whatsapp Group