महालक्ष्मी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्याने येताना मंदिरात येणाऱ्या भाविकाप्रमाणे घंटा वाजविली. भाविकाच्या आविर्भावात आलेल्या या चोराने स्वतःला पूर्णपणे झाकलेले होते. हाताला कोपरार्यंत हँडग्लोज घातले होते.
या ठिकाणी २ महिन्यांपासून सुरक्षारक्षक नव्हता. त्यामुळे चोराला दागिन्यांवर डल्ला मारणे सोपे झाले. या चोरट्याची ओळख अद्याप पटलेली नसून त्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.