पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डीतील डॉ. डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालयातील सहा वर्ष कार्य काळाच्या ‘फार्म डी’ या विशेष अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी व प्राध्यापक यांनी एकत्रित येऊन डॉक्टर दिन उत्साहात साजरा केला. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापकांनी महाविद्यालयाचे सहयोगी असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलला भेट देऊन तेथील सर्व डॉक्टरांना पुष्पगुच्छ देत या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी तेथील डॉक्टर्स व फार्म डी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तथा प्राध्यापक यांच्या दरम्यान आधुनिक जीवनशैली द्वारे निर्माण होणारे आजार व त्यावर संयुक्त पद्धतीने करण्यात येणारे उपचार यावर सविस्तर चर्चा झाली. पाश्चिमात्य धर्तीवर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या संघांमध्ये फार्म डी च्या विद्यार्थ्यांची भर पडल्यामुळे हा संघ अधिक मजबूत झाला आहे. व त्यामुळे भविष्यात औषध उपचारांमध्ये गुणात्मक बदल दिसून येईल असा विश्वास यावेळी लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांनी व्यक्त केला.
फार्म डी या नवीन अभ्यासक्रमाद्वारे निर्माण होणारे फार्मसिस्ट आपल्या ज्ञानाद्वारे तथा डॉक्टरांच्या साथीने औषधोपचारांचा योग्य उपयोग, सुयोग्य मात्रा व दुष्परिणामांना पायबंद या क्षेत्रामध्ये विशेष सेवा देणार असल्यामुळे डॉक्टर दिनाच्या अशा उपक्रमांना वेगळे महत्त्व असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नीरज व्यवहारे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक सुधीर पांड्या व प्राध्यापक संकेत यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group