नवी दिल्ली (Pclive7.com):- राज्या

विधानसभेतील आमदारांमध्ये फूट पाडल्यानंतर आपण शिवसेना सोडली नसून शिवसेनेतच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत होता. शिंदे गटाने भाजपसोबत जात राज्यात सरकारदेखील स्थापन केले. त्यानंतर शिंदे गटात अनेक पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी सामिल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर कारवाई सुरू झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे यांच्या नेतृत्वातील कार्यकारणी बरखास्त केल्याची घोषणा करत स्वत:ची नवीन कार्यकारणी घोषित केली. त्यानंतर शिंदे गट आता शिवसेनेवर दावा करणार असल्याची चर्चा होती. आता ही चर्चा खरी असल्याचे स्पष्ट होत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील खासदारांकडे लोकसभेचे गटनेतेपद गेल्यानंतर या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला रात्री उशिरा एक पत्र दिले. या पत्रात बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी असून त्यांना मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.





















Join Our Whatsapp Group