पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर दोन गटात विखुरलेले शिवसैनिक एकत्रित यावे व शिवसेना पूर्वीप्रमाणेच अखंडित रहावे या उद्देशाने हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम भाऊ शिंदे यांनी शिवसेना अखंडित राहावी यासाठी सोलापूर ते बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ येथे दिनांक २१ जुलै रोजी स्मृतीस्थळाच्या दिशेने प्रस्थान केलेल्या अखंड शिवसेना पदयात्रेचा आज फुगेवाडी येथे प्रस्थान झाले.

वय वर्ष ४२ उत्तम शिंदे हे दैनंदिन ३५-४० किलोमीटर पदयात्रा करत सर्व शिवसैनिकांमध्ये शिवसेनेचे एकजूट अबाधित राहो या दृष्टिकोनातून मार्गदर्शन व प्रचार करीत पायी वारी करत आहेत. त्याप्रसंगी पिंपरी विधानसभा युवा अधिकारी निलेश हाके यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
सबंध महाराष्ट्रातील शिवसैनिक आज दोन गटात विखुरले आहेत. दोन्ही गट एकत्र येऊन पुन्हा एकदा शिवसैनिकांची ताकद विरोधकांना दाखवून देऊ असे मत त्यावेळी निलेश हाके यांनी व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group