पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील वाईन शॉपवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या नऊ जणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. शनिवारी (दि.२६) पिंपरीगाव येथील नवमहाराष्ट्र शाळेजवळ ही कारवाई करण्यात आली.

यश कैलास भोसले (१९ रा. पिंपरी), आकाश विनोद हराळे (२६ रा. पिंपरी), मोहम्मद शेख निहाल (२५ रा. चिंचवड), अजय लोभाजी कांबळे (२० रा. चिंचवड), महेश महादेव चंदनशिवे (२६ रा. चिखली), अनिकेत पवार (२१ रा. खडकी), अविनाश पवार (२३ रा. चिंचवड), शुभम घरवाढवे (१९ रा. पिंपरी), बालाजी ओगले (२५, रा. पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे यांनी फिर्याद दिली आहे. दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी पिंपरीगाव येथील नवमहाराष्ट्र शाळेजवळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता ते पिंपरीगाव येथील रिगल वाईन शॉप येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची देशी बनावटीची पिस्तूल, ४ हजार रुपयांची ४ जिवंत काडतुसे, बंदूक, ९० हजार रुपयांचे सात मोबाईल फोन, दोन मिरची पावडरच्या पुड्या, १ लाख २० हजार रुपयांच्या ४ दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.






















Join Our Whatsapp Group