पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत मोशी येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मीडियम स्कुल अँड जुनिअर कॉलेज येथील ९ वी मधील विद्यार्थी कु.कृष्णा सुरज फुगे याने प्रथम क्रमांक पटकवला.

यास्पर्धेत जिल्ह्यातील १७ वर्षा खालील वयाेगटातील कुस्तीगीर सहभागी झाले हाेते. स्पर्धेत अटीतटीच्या झालेल्या लढतीत कृष्णा फुगे याने अद्वितीय कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवले. महानगरपालिकेच्या तीनही लढतीत त्याने प्रथम क्रमांक मिळवला.

कृष्णाच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनायक भोंगळे, सचिव संजय भोंगळे, संचालिका सौ. कविता कडू पाटील, विश्वस्त सौ. सरिता विखे पाटील, मुख्याध्यापक शशिकांत जोडवे यांनी कृष्णा फुगे याचे अभिनंदन केले व त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





















Join Our Whatsapp Group