पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये दिनांक ३१ जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
आज दि.०१ फेब्रुवारी २०२३ रोजी विहित वेळेत २ उमेदवारांनी ३ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. अॅड. अनिल बाबू सोनावणे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया) यांनी २ तर श्री. मिलिंद कांबळे (अपक्ष) यांनी १ अर्ज दाखल केला असल्याची माहिती चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे माध्यम कक्षाचे समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली आहे.