पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली. काहीेवेळातच ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर हे राहुल कलाटे यांची भेट घेणार आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक राजकीय घडामोडी चिंचवड मतदारसंघात घडण्याची शक्यता आहे. जनभावनेचा अनादर मी करणार नाही, असे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीचे नाना उर्फ विठ्ठल काटे हे अधिकृत उमेदवार असून, बंडखोर राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे असताना राहुल कलाटे हे मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.