पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व भाजपाचे युवा कार्यकर्ते अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना मोफत नोकरी कार्ड वाटप अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत बेरोजगार युवक युवतींना जॉब कार्ड देऊन त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. शहरातील पाच हजार तरुण-तरुणींनी जॉब कार्ड वाटप करण्याचा त्यांचा निश्चय आहे.
भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात काही तरुण-तरुणींना जॉब कार्डचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम निगडी येथील संत तुकाराम संकुल सभागृहात झाला. या कार्यक्रमाला पिंपरी महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार, महापौर नितीन काळजे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड सचिन पटवर्धन, माजी महापौर आझम पानसरे, उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका शर्मिला बाबर, योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, कमल घोलप, नगरसेवक उत्तम केंदले, केशव घोळवे, बाबू नायर, अमित गावडे, सदाशिव खाडे, प्रमोद निसल, नगरसेविका शितल शिंदे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, अनुप मोरे, राजू दुर्गे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकाबंळे आदी उपस्थित होते.
या अभियाना अंतर्गत बेरोजगार युवक युवतींना जॉब कार्ड देऊन त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीकृत उमेदवारांना एक वर्षाच्या कालावधीत त्यांच्या शैक्षणिक व कामाच्या पात्रतेनुसार, नोकरी विषयीचा दररोज किमान एक मेसेज त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात येणार आहे. त्यात एक लिंक दिली जाईल, ती ओपन केल्यास, ज्या कंपनीत नोकरी उपलब्ध आहे. त्या कंपनीची संपूर्ण माहिती (उदा. कंपनीचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, कामाचे स्वरूप, पगार) असेल.
त्या मेसेजच्या माध्यमातून पुढील २४ तासात त्या उमेदवारांना नोकरीविषयक निर्णय घेणे सोपे जाईल. वेळेप्रसंगी उमेदवारांना मुलाखत/नोकरी/कामाबाबतचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण कालावधीमध्ये युवक-युवतींना प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी मोफत प्रवासाची व जेवणाची व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे. किमान ४०० कंपन्यासोबत याबाबात करार करण्यात आलेला असून एक रुपया देखील न घेता, प्रत्येक कार्डधारकास १००% नोकरी ही मिळणारच ही हमी संयोजकाच्या वतीने घेण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात राज्याच्या कानाकोप-यातून तरुण-तरुणी नोकरीसाठी येतात. परंतु, पात्रता, क्षमता असूनही सगळ्यांनाच नोकरीची संधी मिळत नाही. जास्तीत-जास्त तरुण-तरुणींनी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, अमित गोरखे म्हणाले. या उपक्रमांचा बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहनही, त्यांनी केले.
यावेळी गोरखे यांना शुभेच्छा देत असताना आमदार लक्ष्मण जगताप म्हाणाले की, स्वतः साक्षर व सामर्थ्यवान झाल्यानंतर इतरांनाही ताकदवान करण्याचे काम अमित करत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत करण्यासाठी अमित प्रयत्नशील असतो. तसेच सतत नाविन्यपूर्ण प्रयोग तो करत असतो. त्यातूनच त्याने परिसरात पुरेशी माहितीही नसलेले हॉटेल मॅनेजमेंटचे महाविद्यालय सुरु केले. ज्यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळाला. आत्ता सुरू केलेल्या नोकरी कार्य या उपक्रमातून पाच हजार तरुणांना रोजगार देण्याचा मानस असून दोन हजार तरुणांना उद्योगाची हमीही देण्यात आली आहे. त्याचे हे समाजकार्य असेच उत्तरोत्तर वाढवावे, अशा आमच्या शुभेच्छा सदैव त्याच्या पाठीमागे राहतील.
यावेळी महापौर नितीन काळजे यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की, शहरातील सुशिक्षित व धडाडीचा चेहरा हे खूप कष्टातून तो उभा राहिला आहे. आई शिक्षिका होती यातूनच त्याने आज शिक्षण संस्था उभारल्या आहेत. पिंपरी-चिंचवड मधला पहिला तरुण आहे ज्याला राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातही त्याची दिग्गजांशी जवळीक आहे. त्यामुळे बाहर गेल्यानंतर पिंपरी चिंचवडचा विषय निघाला की अमितची आवर्जून ओळख सांगितली जाते. त्याचे काम शहरासाठी व शहरवासीयांसाठीही लाभदायक आहे. त्याचे हे काम असेच पुढेही वाढत राहो, अशा शुभेच्छा यावेळी काळजे यांनी दिल्या.
या उपक्रमासाठी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, माजी महापौर आझम पानसरे, नगरसेविका अनुराधा गोरखे यांचे मार्गदर्शन लाभले. ज्या तरुणांना नोकरी कार्ड हवे आहे. त्यांनी निगडी येथील संत तुकाराम संकुल नॉव्हेल संस्था येथे सकाळी नऊ ते सांयकाळी ५ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group