भोसरी (Pclive7.com):- कुदळवाडी येथे स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी सिरवी समाज बांधवांसोबत पारंपारिक ‘होलिकोत्सव’ साजरा केला.

याबाबत माहिती देताना दिनेश यादव म्हणाले की, सिरवी समाज बांधवांसोबत, भगिनींसमवेत ‘होलीकोत्सव’ साजरा करण्याचा आनंद काही औरच आहे. समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभलेला हा समाज शतकानुशतके देशाच्या कला आणि वेशभूषेच्या क्षेत्रात भर घालत आला आहे. त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी त्यांच्या या आनंदोत्सवात सहभागी होण्याचा केलेला आग्रह मोडता आला नाही.
सिरवी समाजाला एक वैभवशाली सांस्कृतिक इतिहास लाभला आहे. वाळवंटात राहणाऱ्या या समाजाने आपली लोकसंस्कृती कायम जपली आहे. पारंपारिक नृत्य आणि त्यातील वेशभूषा सुंदर आहे. त्याला एक रेखीव बाज आहे. समाजातील संस्कृती आपल्याला जपायची आहे असे यादव यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group