पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीमधील खराळवाडी भागातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत शनिवारी पहाटेच्या सुमारास शॉट सर्किट झाले. यामुळे लागलेल्या भीषण आगीत बँकेतील फर्निचर व कागदपत्रे जळून खाक झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, खराळवाडीतील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला पहाटे चारच्या सुमारास शॉट सर्किटमुळे आग लागली. आग लागताच याची सुरक्षा रक्षकाने अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल होताच जवानांनी आग आटोक्यात आणली.
वेळीच आग आटोक्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बँकेतील फर्निचर आणि कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. यात सुमारे १० लाख रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Tags: Pcmc news



















Join Our Whatsapp Group