पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. उद्योजक कार्तिक लांडगे यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम पार पडला.

दिनेश यादव म्हणाले की, कुदळवाडी भागात ४० रहिवासी घरांमध्ये व २० उद्योजकांना पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे अशा तक्रारी काही दिवसांपूर्वी येत होत्या. याबाबत तातडीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निधी उपलब्ध करून दिला. लवकरच पाण्याची लाईन टाकण्याचे काम पूर्ण करून सबंधित घरांना पाणीपुरवठा सुरळीत होईल.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, माजी नगरसेविका अश्विनी जा़धव, संतोष मोरे, अंकुश मळेकर, किसन यादव, दत्तात्रय मोरे, कमलाकर बालघरे, वसंत मोरे, प्रतिक मोरे, मनोज मोरे, अक्षय मोरे, कुंडलिक मोरे, रामकृष्ण लांडगे, रोहित जगताप, राहुल पांचाळ, सुरेश वाळुंज, दिपक घन, रोहित कदम, दिनेश गोत्राळे, संतोष जाधव, उत्तम बालघरे, पोलिस अधिकारी नकुल नेमाणे, सौरभ मोरे, विठ्ठल महाराज गवळी, सतीश जरे, मुजफ्फर सिद्दीकी, ताजुद्दीन खान, महेश आवटे, फिरोज शेख, शुक्रराज कड, निलेश यादव, प्रकाश चौधरी आदि उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group