पिंपरी (Pclive7.com):- जागतिक सायकल दिनानिमित्त उद्या (दि.३ जून) रोजी सकाळी ७ वाजता पर्यावरण जागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सायकल फेरीत हिरो सायकल्स व हयात प्लेस (४ स्टार) प्रायोजित पर्यावरणाबद्दल जागृती करण्यासाठी रॉ पार्टनर व इंडियन सायकल क्लबचे सर्व सदस्य, हॉटेल हयात स्टाफ, हिरो कंपनी, बोडके सायकल्स स्टाफ सहभागी होणार आहेत.
सायकल फेरी बोडके सायकल्स, रहाटणी फाटा – रहाटणी गाव- कोकणे चौक पिंपळे सौदागर – जगताप डेअरी – रावेत रोड – दत्तमंदीर रस्ता – हिंजवडी – हॉटेल हयात पर्यंत आहे. त्यानंतर श्रमपरीहार नास्टा हॉटेल हयात त़र्फे देण्यात येणार आहे. बोडके सायकल्स व रॉ पार्टनर सायकल क्लबने सदर फेरी आयोजित केली आहे.
सदर कार्यक्रमासाठी संयोजन श्री प्रेमसागर (हिरो), चिरागजी मनोचा, श्वेताजी बंगा (रॉ पार्टनर व मेहबुब शेख, सकलेन (बोडके सायकल्स) करणार आहेत.