भोसरी (Pclive7.com):- आमदार पै. महेशदादा लांडगे युवा मंच व हभप वामनमहाराज यादव, कै. नथु खंडु यादव, कै. सुदाम नथु यादव, गुलाब नथु यादव सेवा संस्था याच्या वतीने कुदळवाडीत पवित्र अशा श्री विठ्ठल मंदिरात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. किसनराव लांडगे यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्ताने खिचडी व फराळ वाटप करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन स्वीकृत सदस्य दिनेश लालचंद यादव यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी अनेक भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.