पिंपरी (Pclive7.com):- मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने कायम केलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून आणि नागरिकांना पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
त्या प्रसंगी प्रदेश सचिव गौरव चौधरी, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, कुंदन कसबे, विक्रांत सानप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, वसीम खान व इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते.