पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी परिसरात पाणीपुरवठ्याची वेळ वाढवावी अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे. याबाबत दिनेश यादव यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, आधीच दिवसाआड पाणीपुरवठ्याने हैराण झालेल्या नागरिकांना कमी दाबामुळे पाणी पुरवठा होत आहे. कुदळवाडी परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकवस्ती भागाचा सर्वे करुन वेळ वाढविण्यात यावा. कुदळवाडी परिसरातील पाणीपुरवठा वेळ तसेच नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अशी मागणी यादव यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group