पिंपरी (Pclive7.com):- आळंदीत भीषण स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ही घटना पाच च्या सुमारास आळंदीतील सोळू गावात घडली. अद्याप नेमकं डीपी (विद्युत रोहित्र) की बंद असलेल्या कंपनीत स्फोट झाला हे समजू शकलं नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत. स्फोट झाल्याने पन्नास मीटर अंतरातील परिसर हादरला. मोठी हानी झाली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीतील सोळू गावात भीषण स्फोट झाला आहे. रस्त्यावर उभा असलेल्या व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. कंपनीच्या आजूबाजूच्या घरातील आणि रस्त्यावरील इतर सात जण जखमी झाले आहेत. ही घटना नागरीवस्तीत घडली. ज्या ठिकाणी स्फोट झाला आहे, तिथं अल्युमिनियम प्लेट तयार करणारी कंपनी आहे. ती गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. मात्र, कंपनीतच भीषण स्फोट होऊन डीपीला आग लागली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. या गंभीर घटनेत एका व्यक्तीच्या जीव गेला असून सात जण जखमी आहेत.























Join Our Whatsapp Group