पिंपरी (Pclive7.com):- आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी
सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत त्यांचा त्रास कमी व्हावा आणि शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून सुरु करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानाचा नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यात मोठे यश आले. या उपक्रमांतर्गत सर्व नागरिकांना शासनाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांबद्दल मार्गदर्शन देखील मिळाले. विविध योजना, त्यांची माहिती, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे व ती कागदपत्रे कशी मिळवायची अशा प्रक्रिया सहज व सोप्या पद्धतीने समजल्या. त्यामुळे पुढील काळात विविध विभागात जाऊन आवश्यक योजनांसाठी नागरिक पात्र ठरु शकतात. त्यामुळे हे अभियान जनसेवेचे एक मॉडेल म्हणून आदर्शवत ठरेल हा विश्वास आहे.
या अभियानात सहभागी झालेले सर्व महानगरपालिका अधिकारी, भागातील जेष्ठ नागरिक, माता-भगिनी, सदस्य तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार दिनेश यादव यांनी मानले आहेत.
























Join Our Whatsapp Group