पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रमुख पाहुणे व शाळेचे संचालक संदीप काटे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसह भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शिवजयंती निमित्त शाळेतील ५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांनी नाट्यमय पोवाडा सादर केला. तसेच इ. ८ वी चा विद्यार्थी आयुष सोनवणे याने पोवाडा सादर केला. इ.१ ली ते ६ वी च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर भाषण केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केले होते, त्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली. शिवजयंतीचे व भव्य रॅलीचे आयोजन हे शाळेच्या उप. मुख्याध्यापिका सुविधा महाले मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला सहकार्य मयूर काळे सर शिक्षकवर्ग, अमर, सागर काटे यांनी केले.
























Join Our Whatsapp Group