पुणे (Pclive7.com):- पुणे शहरातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये हंगामापूर्वीच रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. दाखल झालेल्या कोकणी हापूसच्या तीनही पेट्यांना ११ हजार १११ रुपये इतका दर मिळाला आहे. थंडीचे प्रमाण कमी झाल्यानंतर मार्चमध्ये हापूस आंब्याचे राज्यभरातील मार्केटमध्ये आगमन होईल, असा अंदाज आंबा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
फळांचा राजा अशी ख्याती असलेल्या आंब्याला सर्वत्र मागणी असते. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, देवगड, सावंतवाडी या परिसरातील आंब्यांना परदेशातही मागणी असते. बदलते वातावरण आणि वाढत्या थंडीचा परिणाम आब्यांच्या मोहोरावर होत असतो. पण याची सांगड घालून आंबा उत्पादक आंब्याचे पीक घेण्याकडे वळत आहेत.
यावर्षी थंडीचा काहीसा परिणाम आंब्यांच्या मोहोरांवर झाला आहे. मात्र, तरीही सर्वसामान्यांच्या आवाक्यातील हा आंबा एप्रिलपर्यंत बाजारपेठेत दाखल होईल, असे मत आंबा व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.























Join Our Whatsapp Group