मुंबई (Pclive7.com):- गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई उत्तर मध्य येथून भाजपचा उमेदवार कोण असणार? याबद्दल चर्चा होती. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड लढणार आहेत. पण भाजपने येथून आता उमेदवारी जाहीर केली आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने संधी दिली आहे. त्यामुळे भाजपमधून उज्ज्वल निकम आपल्या राजकारणाचा प्रवास सुरू करताना दिसणार आहेत.
मुंबई उत्तर मध्य येथे पूनम महाजन यांचा भाजपने पत्ता कट केला आहे. यानंतर भाजपमधून अनेकजण या मतदार संघासाठी इच्छूक होते. पण राजकारणात एन्ट्री करत असलेल्या उज्वल निकम यांच्यावर भाजपने विश्वास टाकला आहे. महाराष्ट्र भाजपकडून उज्जल निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबईकरांसाठी परिचयाचा चेहरा
वर्षा गायकवाड या मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा आहेत. महाविकास आघाडीच्या काळात त्या मंत्रीदेखील होत्या. तर दुसरीकडे उज्ज्वल निकम यांचा चेहरा मुंबईकरांसाठी परिचयाचा आहे. मुंबई हल्ल्यातील सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी केली. दहशतवादी कसाबला 2012 मध्ये फाशी देण्यात आली. यात निकम यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. खैरलांजी हत्याकांड सारखे संवेदशील प्रकरण त्यांनी हाताळले. त्यामुळे ही निवडणूक आता कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.