पुणे (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (४ जून) रोजी लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले होते. त्यामध्ये एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच इंडिया आघाडीला १५० ते १७० जागा मिळतील, असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं. असं असलं तरी एनडीए की इंडिया आघाडी कोण सत्ता स्थापन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ४०० पारचा नारा दिला होता. संपूर्ण प्रचारात भाजपाच्या नेत्यांनी ४०० पारच्या नाऱ्यावर नेत्यांनी भर दिला. मात्र, निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आल्यानंतर एनडीए ४०० पार करणार नाही तर ३७५ पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाजपाचं ४०० पारचं स्वप्न भंगणार असं चित्र दिसत आहे. पण असं असलं तरी एनडीए बहुमतात सत्ता स्थापन करेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आलेला आहे.
दुसरीकडे इंडिया आघाडीला एक्झिट पोल्सलच्या अंदाजानुसार १५० ते १७० पर्यंत जागा निवडून येतील, असं म्हटलं आहे. मात्र, इंडिया आघाडीने एक्झिट पोल्सलची आकडेवारी फेटाळून लावत इंडिया आघाडी देशात २९५ जागा निवडून येतील, असा दावा केला आहे. त्यामुळे देशाचा कौल एनडीए की इंडिया आघाडीला आहे, याचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज ४ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा हॅटट्रीक करणार की इंडिया आघाडीला यश मिळणार? याचा निर्णय आता अवघ्या काही तासांत समजणार आहे.























Join Our Whatsapp Group