पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघाचा नवा खासदार आज मंगळवारी (दि. ४) ठरणार आहे. शिवसेना (शिंदे गट) चे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे पाटील बाजी मारणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दुपारी दोनपर्यंत निकाल स्पष्ट होऊन विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत आणि पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाघेरे पाटील यांच्यात प्रमुख लढत दिसून आली. त्यांच्यासह बहुजन समाज पाटींचे राजाराम पाटील, वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी यांच्यासह तब्बल ३३ जण रिंगणात होते.
बोपखेलच्या मुळा नदीपासून ते उरणच्या समुद्रापर्यंत वसलेल्या या मतदारसंघात प्रचार करताना उमेदवारांसह कार्यकत्यांची मोठी दमछाक झाली, तळपत्या उन्हात संपूर्ण मतदारसंघ पालथा घालून प्रचार केला गेला. जाहीर सभा, रॅली, मेळावे, बैठका, कोपरा सभा आदीवर प्रचारात भर दिला गेला. महायुतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले तर, महाविकास आघाडीसाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, आपचे खासदार संजय सिंह आदींनी सभा घेतल्या होत्या.























Join Our Whatsapp Group