सुप्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या फोटोग्राफीचा स्लाईड शो आणि प्रकट मुलाखत
पिंपरी (Pclive7.com):- सुप्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील यांनी जंगलातील थरारक प्रसंग, प्राणी पक्षी यांच्या विविध हालचाली, वाघ, सिंह, हत्ती पासून जगभरातील विविध वाईल्ड लाईफ सेंचुरी व भारतासाह अनेक देश विदेशात टिपलेल्या प्राणी व पक्षी यांच्या अप्रतिम फोटोग्राफीचा स्लाईड शो व त्त्यांची प्रकट मुलाखत असा अनोखा कार्यक्रम उद्या रविवारी ग. दि. ९ जून रोजी सकाळी ९.३० वाजता माडगूळकर नाट्यगृह निगडी प्राधिकरण येथे पाहता येणार आहे.
वाईल्ड लाईफ फोटोग्राफी स्लाईड शो व त्याच फोटोग्राफर कडून अनुभव कथन असा कार्यक्रम पिपंरी चिंचवड मध्ये प्रथमच होतं आहे. महामेट्रो पुणे व नागपूरचे महाव्यवस्थापक व पिपंरी चिंचवडचे माजी आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड, इनोव्हेटिव्ह वल्ड स्कूलचे संचालक डॉक्टर संजय सिंग आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची क्रेझ जगभरात आहे. यातूनच निसर्ग आपण खूप जवळून समजून घेऊन शकतो या भावनेने देवदत्त फोटोग्राफी स्कूल चिंचवड यांनी हा कार्यक्रम जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केला आहे. सुप्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पाटील दोन दशकापेक्षा जास्त काळ वाईल्ड फोटोग्राफी या प्रकारात काम करत असून त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आजवर मिळाले आहेत. नुकताच त्याना फ्रांस मध्येही पुरस्कार प्राप्त झाला असून देश विदेशात त्त्यांची अनेक वर्कशॉप पण आयोजित होतं असतात.
वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल अनेक समज गैरसमज, त्यातील आव्हाने, कोणते कॅमेरे वापरावे, कोणत्या लेन्स वापराव्यात, कोणत्या वेळी कुठे वक्षकशी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करावी. या व अशा अनेक प्रश्नांची उत्तर या कार्यक्रमात मिळणार असून बैजू पाटील यांची मुलाखत सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर घेणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रमाणे बैठक व्यवस्था असून कार्यक्रमास कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.























Join Our Whatsapp Group