पिंपरी (Pclive7.com):- शालेय वयापासून परदेशी भाषा शिक्षणाचे महत्त्व या विषयावर नोव्हेल संस्थेच्या वतीने उद्या (शनिवारी) मोफत चर्चासत्राचे आयोजन केले आहे. फ्रेंच ,जर्मन व इतर भाषांमध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थी व पालकांनी चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन, संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले आहे.
निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात शनिवारी सकाळी 10 वाजता हे चर्चासत्र होणार आहे. यामध्ये भाषातज्ज्ञ डॉ. सविता केळकर,CSR संचालक बागेश्री मंथळकर, CSR प्रमुख योगिता आपटे, प्रिया कुलकर्णी, IICMRच्या संस्थापक डॉ. अश्विनी कुलकर्णी,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कैलास पवळे, RIANचे संस्थापक आनंदसागर शिराळकर हे सहभागी होणार आहेत. तर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, रवी राजापूरकर डॉ. शोभना पालेकर, मुक्ती पानसे उपस्थित राहणार आहेत.
नोव्हेल इंस्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च गेली 22 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नॉवेल इंस्टिट्यूट तर्फे परदेशी भाषा प्रशिक्षण समाजतल्या सर्व स्तरांपर्यंत पोचवण्यासाठी 2019 साली Foreign Language Online Application (FLOA) ची स्थापना झाली. जेव्हा एखादा विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतो तेव्हा त्याला अभ्यासक्रमातील विविध विषयांची ओळख करून दिली जाते.
गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय विद्यार्थ्यांनी शिकणे अनिवार्य आहे. विद्यार्थी या विषयांचा प्रारंभिक आणि मध्यवर्ती अभ्यासक्रम शिकतात आणि पुढे जाऊन या विषयांशी संबंधित व्यवसाय निवडू शकतात. या अनिवार्य विषयांच्या व्यतिरिक्त, अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून परदेशी भाषा प्रशिक्षण सुद्धा गरजेचे आहे. सद्य स्थितीत अशा प्रकारचा अभ्यासक्रम व प्रशिक्षण फक्त मूठ भर शाळांमध्ये उपलब्ध आहे. भारतातील बहुसंख्य शालेय विद्यार्थ्यांना ते उपलब्ध नाही आणि जिथे उपलब्ध आहे तिथे परवडणारे नाही.
सध्या जर्मन आणि फ्रेंच या 2 युरोपियन भाषांमध्ये परदेशी भाषा प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यातून व गुजरात, कर्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांतील प्रमुख सहभागासह FLOA भारतातील 22+ राज्यांमध्ये रुजलेले आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये उपक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत 7000 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.























Join Our Whatsapp Group