चिंचवड (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटच्या वतीने संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय, मु.पो. भोगेवाडी, ता. म्हाडा, जि.सोलापुर येथे हॅप्पी स्कुल प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.
या शाळेमध्ये एकूण १९५ विद्यार्थी अध्ययन करीत असुन बरेच विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येत असतात. परंतु या शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांना ब-याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी शाळेमध्ये पिण्याच्या व वापराच्या पाण्याची व्यवस्था, शालेय व ऑफिस फर्निचर, सोलर सिस्टीम, प्रवासी बस, संगणक संच इत्यादींची मदत मिळणेकामी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीकडे मागणी केली होती. त्यानुषंगाने दोन्ही रोटरी क्लबच्या सदस्यांनी मे महिन्यामध्ये या शाळेला समक्ष भेट देऊन जी मदत देणे शक्य आहे ती देण्याचे आश्वासीत केले होते. त्यानुसार सदर शाळेला मंगळवार दि. १८ जुन २०२४ रोजी शाळेच्या जागेमध्ये सुमारे ५० फुट खोल विहिर, १० संगणक संच, २८ बेंचेस, ऑफिस फर्निचर, प्रत्येक विद्यार्थ्याला जेवणाचा स्टीलचे डबा व पाण्याची स्टील बाटली, पेन आदी वस्तु भेट देण्यात आल्या.
त्याचप्रमाणे शाळेच्या आवारात वृक्षारोपन देखिल करण्यात आले. यावेळी शालेय प्रशासन व विद्यार्थी वर्ग यांनी समाधान व्यक्त केले. या हॅप्पी स्कुल प्रकल्पासाठी वॉलवर्कस इंडिया, मराठवाडा मित्र मंडळ व समाजातील अनेक दानशुर व्यक्तींनी आर्थिक व भेटवस्तुच्या माध्यमातुन मोलाचे सहकार्य केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट व रोटरी क्लब ऑफ टेंभुर्णीचे अध्यक्ष, पदाधिकारी, शाळेचे संस्थापक अध्यक्ष, संचालक, शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group