वाकड (Pclive7.com):- हॉटेलचे रिझर्वेशन करण्याचा टास्क देऊन वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेतले. यात एका व्यक्तीची ४० लाख ५४ हजार ७२ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट २०२३ ते ७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत काळेवाडी येथे घडला.

काळेवाडी येथील ३६ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस टेलिग्राम अकाउंटवरून पार्ट टाइम जॉबची जाहिरात दाखविण्यात आली. ती जाहिरात पाहून त्यामध्ये फिर्यादी यांनी रस दाखविला असता अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीस हॉटेलचे रिझर्वेशन करण्याचा टास्क दिला. त्यात त्याची ४० लाख ५४ हजार ७२ रुपयांची फसवणूक करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group