मुस्लिम समाजाच्या विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार
मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यातील सामाजिक सलोखा जपणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन व समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही काम करीत आहोत, असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले.
मावळ तालुक्यातील मुस्लिम समाजातर्फे आमदार सुनील शेळके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
आमदार शेळके म्हणाले की, मुस्लिम बांधवांनी ज्या कामांसाठी निधीची मागणी केली. त्या कामांना निधी उपलब्ध करता आला, याचे मला समाधान आहे. यापुढेही लोकहिताच्या कामांसाठी जो निधी लागेल तो उपलब्ध करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन. मुस्लिम समाजाच्या विविध कामांसाठी आमदार शेळके यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास हज कमिटीचे माजी अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख, संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी नगराध्यक्षा ॲड.रंजनाताई भोसले, ज्येष्ठ नेते तानाजी दाभाडे, विष्णूभाऊ गायखे, गजानन शिंदे, निलेश दाभाडे, देवाभाऊ गायकवाड, बाबा मुलाणी, आशिष ठोंबरे, रशीद शेख, मुश्ताक काठेवाडी, रफिक शेख, अतिख खान, अकबरभाई शेख, रज्जाक मणियार, अहमद शेख, रशीदभाई सिकिलकर, रफिक आत्तार, साबीर शेख, अशपाक खान, गणीभाई शेख तसेच इतर मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.