नवी दिल्ली (Pclive7.com):- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार आहे, तर निकाल २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार असून राज्यात एका टप्प्यात मतदान होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक विभागाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ हा २६ नोव्हेंबर रोजी तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा संपुष्टात येण्याआधी नवीन विधानसभा गठीत होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या आधीच निवडणुका पार पडणे अपेक्षित आहे. त्यानुसार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे ..
२२ ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची तारीख
२९ ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची तारीख
३० ऑक्टोबर अर्ज छाणणी
४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख
२० नोव्हेंबर रोजी मतदानाची तारीख
२३ नोव्हेंबर रोजी निकाल