पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात भरधाव फॉर्चुनर मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने चौकात कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसली. या अपघातात दुकानातील एकाचा मृत्यू झाला असून तीघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (सोमवारी) दुपारी एक वाजताच्या सुमारास सांगवीतील फेमस चौकात घडली.
सचिन जाधव (वय – ४०, रा. नवी सांगवी) असं या फॉर्चुनर चालकाचे नाव असून Mh12 KJ 0333 या कारवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झालायं. या अपघातात ओमप्रकाश अंबादास पंदीलवार (वय – ६० रा. सांगवी हॉटेल चालक) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बसवराज तळपदे (वय -५० रा. नवी सांगवी), सुवर्णा ओमप्रकाश पंदीलवार (वय – ५०, रा. नवी सांगवी), त्यांचा नातू अनंत पंदीलवार (वय – १० वर्षे) हे जखमी झालेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात जात असताना फेमस चौकात चालकाने नियंत्रण सुटून फॉर्चुनर कार बाजुच्या अनंत हॉटेलमध्ये घुसली. अचानकपणे मोटार शिरल्याने तेथील तिघांना मोटारीची धडक बसली. त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. हा भीषण अपघात सीसीटिव्हीत कैद झाला आहे.






















Join Our Whatsapp Group