पिंपरी (Pclive7.com):- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाल्याबद्दल पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज पेढे वाटून, ढोल वाजवून जल्लोष साजरा केला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला.
भाजपच्या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपा अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, शहर प्रवक्ते अमोल थोरात, राजेश पिल्ले, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, सिमा चौगले, वैशाली खाड्ये, संजिवनी पांडे, बिभिषण चौधरी, प्रदिप बेंन्द्रे, पूजा वायचळ, विजय शिनकर, आशा काळे, गणेश लंगोटे,पद्मनाभ शेट्टी, विठ्ठ्ल भोईर, राजेंद्र गावडॆ, सुरेश भोईर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले भरघोस यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्यांचा असलेल्या विश्वासामुळे मिळाले आहे. मोदींचे विकासकारण देशाला समोर नेऊ शकते, अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड भाजपा अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
कर्नाटक मधील भारतीय जनता पक्षाचा मिळालेले भरघोस यश हा पक्षाच्या सिद्धांताचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी व्यक्त केली. जनसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचा पक्षाचा विचार आहे. काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांच्या तिटकारा भारतीय जनतेला आला आहे, हेच या विजयातून दिसते, असे अमोल थोरात यांनी सांगितले.
कर्नाटकमध्ये २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळली. मात्र, नंतर भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला मागे टाकले. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी यापूर्वीच आमचेच सरकार स्थापन होईल असा दावा केला होता. कर्नाटकमध्ये भाजपाला मिळालेले भरघोस यश मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. कर्नाटक निवडणुकीकडे २०१९ मध्ये होणा-या लोकसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून पहिले जात आहे. या पूर्वतयारीमध्ये भाजप पास झाल्याच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.