पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड कुणाचे हा प्रश्न कायम चर्चेत असतो. पालकमंत्री गिरीश बापट अधूनमधून शहरात येत मीच सर्वेसर्वा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करतात. पण हा फोटो बघितल्यानंतर त्यांना काय सांगायचे हे जाणकार वाचकांनी समजावे… आम्हाला वाटते पिंपरी चिंचवडचे ‘बॉस’ लक्ष्मणभाऊ आणि महेशदादा अाहेत अशी खात्री पटल्यामुळेच पालकमंत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणी शहरातील या आमदारांना अशा प्रकारे ‘सॅल्युट’ मारला असावा.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे नेहमीच चर्चेत असतात. पिंपरी चिंचवड शहरातील स्वतंत्र आयुक्तालया संदर्भाच्या बैठकीला बापट आले होते. यावेळी त्यांनी येताच क्षणी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना चक्क ‘सॅल्युट’ मारला. पालकमंत्र्यांनी अचानकपणे केलेल्या अँक्शनमुळे आमदार जगताप आणि लांडगे दोघेंही गोंधळून गेले. तर उपस्थित असलेले देखील चक्राऊन गेले.





















Join Our Whatsapp Group