पिंपरी (Pclive7.com):- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह आज पिंपरी-चिंचवड शहरात ओसंडून वाहत होता. भारतीय जनता पार्टीने या दिनानिमित्त शहरात १४ मंडलनिहाय एकूण ३१ ठिकाणी भव्य योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमाला हजारो योग साधक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत, निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक परिसरातील शिव छत्रपती लिनियर अर्बन गार्डन येथे झालेल्या योग शिबिराला विशेष प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पार्टी, रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभाग, संघ परिवार आणि आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या शिबिरात आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपचे सत्यजित भैया यांनी संगीताच्या तालावर उपस्थितांकडून विविध योगासने आणि प्राणायाम करून घेतले. त्यांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले फायदे याबद्दल सविस्तर माहिती देत, नागरिकांना योगाभ्यासाविषयी जागरूक केले.

समीर लॉन्स, रावेत, काशिधाम मंगल कार्यालय, पवना नगर चिंचवड, शुभम गार्डन मंगल कार्यालय, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडे लॉन्स- चिंचवड गाव, ज्योतिबा मंगल कार्यालय काळेवाडी, राम वाकडकर यांचे संपर्क मॅच डेल अरेना टर्फ मैदान वाकड, धर्मवीर संभाजी गार्डन, रहाटणी, स्वर्गीय तानाजीराव शितोळे उद्यान, सांगवी, रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव, कारवार समाज हॉल, नवी सांगवी, नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे यांचे संपर्क कार्यालय, श्रीधरनगर, दुर्गादेवी टेकडी उद्यान, निगडी, शंकर शेट्टी उद्यान, काळभोर नगर, पिरॅमीड हॉल, शाहू नगर चिंचवड, शिव पार्वती सभा मंडप, मोहन नगर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, म्हाडा मोरवाडी, संत तुकाराम महाराज मंदिर, सं.तु.नगर पिंपरी, कासारवाडी सांस्कृतिक भवन, कासारवाडी, गाथा हॉल, वाळूंजकर मिनी मार्केट, दापोडी, शंकर मंदिर, पिंपरी गाव, अटलबिहारी वाजपेयी उद्यान, पूर्णा नगर, तळई गार्डन, जाधव वाडी, ठाकरे क्रीडा संकुल, यमुनानगर निगडी, पांडुरंग बँक्वेट हॉल, चऱ्होली, चक्रपाणी वसाहत, भोसरी, सद्गुरू नगर, भोसरी, सेक्टर १२ इंद्रायणी नगर क्वालिटी सर्कल, इंद्रायणी नगर, सेक्टर ३, इंद्रायणी नगर या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. स्थानिक नगरसेवक, मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, प्रकोष्ट प्रमुख यांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम घेण्यात आले.






















Join Our Whatsapp Group