भोसरी (Pclive7.com):- भोसरी पीएमटी बस स्टॉप येथे गर्दीचा फायदा घेत एका वृद्धेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.२८) सकाळी घडली.

याप्रकरणी २५ वर्षीय आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत तानाजी चिंतामणी पारधी (३९, दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तानाजी यांची आई शनिवारी सकाळी पीएमटी बस स्टॉप येथून जात होत्या. त्यावेळी आरोपी महिलेने गर्दीचा फायदा घेत तानाजी यांच्या आईला झटका देत गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून तिथून पळ काढला. त्यानंतर भोसरी पोलिसांनी तपास करत मंगळसूत्र चोरणाऱ्या या महिलेला अटक केली आहे.






















Join Our Whatsapp Group