पिंपरी (Pclive7.com):- रस्त्यात उभी असलेली ऑटो रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले म्हणून एका दुचाकीस्वाराला तीन जणांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी येथे (दि.०२) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी आरोपी (रोहित संजय लोणारी वय २७ रामनगर, रहाटणी) याला अटक करण्यात आली.

भारत पंजाबी (वय ४४ रा. सिंहगड रोड, बेनकर वस्ती, धायरी पुणे) यांनी यासंदर्भात काळेवाडी पोलिसात फिर्याद आहे. फिर्यादी भारत पंजाबी हे दुचाकीवरून भालेराव कॉलनी, रहाटणी येथून जात होते. त्यावेळी एक ऑटोरिक्षा रस्त्यातच उभी होती. दुचाकी जाण्यासाठी रस्त्यात जागा नव्हती, म्हणून फिर्यादी यांनी हॉर्न वाजवून रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. मात्र आरोपी रोहित लोणारे याने ही रिक्षा काढणार नाही, तुला जाऊ देणार नाही असे म्हणत फिर्यादी यांना शिवीगाळ सुरू केली. आणि काही वेळात सोबत तीन लहान मुलांना घेऊन आला.

“आमच्या येथे पोलीस येत नाहीत, आम्ही इथले बळी आहोत आमच्यावर इथल्या राजकारणी लोकांचा हात आहे”, असे म्हणून त्या सर्वांनी मिळून भारत पंजाबी यांना हाताने बेदम मारहाण केली. तसेच यावेळी रिक्षा चालक रोहित लोणारे याने त्याच्या जवळील फायटरने फिर्यादी यांच्या ओठावर मारहाण करत जखमी केले.

याप्रकरणी काळेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संजय लोणारे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.






















Join Our Whatsapp Group